← मुख्य पृष्ठ

महाज्योतीचा संघर्ष

एका निवेदनापासून सुरू झालेला प्रवास — आज लाखो ओबीसी, व्हीजे-एनटी युवकांचा आधार.

कहाणी

'सारथी'च्या धर्तीवर ओबीसी, व्हीजे, एनटी समाजासाठी स्वतंत्र संशोधन व प्रशिक्षण संस्था असावी, ही मागणी घेऊन स्टूडेंट्स राइट्स असोसिएशन ऑफ इंडियाने (अध्यक्ष: उमेश कोर्राम) २०१९ मध्ये लढा उभारला. दिल्ली ते मुंबई सातत्याने निवेदने, भेटी व आंदोलनांच्या पाठपुराव्यातून 'महाज्योती' प्रत्यक्षात आली.

२६ मार्च २०१९ — पहिले निवेदन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव डी. के. जैन व ओबीसी मंत्री डॉ. संजय कुटे यांना निवेदन — ओबीसी, व्हीजे, एनटी समाजासाठी स्वतंत्र संस्थेची मागणी.

एप्रिल–जून २०१९ — दिल्ली ते मुंबई पाठपुरावा

ना. नितीन गडकरी, ना. रामदास आठवले, खा. इम्तियाज जलील, खा. नवनीत राणा, खा. सुनील मेंढे यांच्या भेटी; विधिमंडळ अधिवेशनात जितेंद्र आव्हाड, डॉ. संजय कुटे, बच्चू कडू, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार यांना निवेदने; छगन भुजबळ यांचे शिफारस पत्र.

६ जुलै २०१९ — शासन निर्णय

स्वायत्त संस्थेच्या अभ्यासासाठी मंत्रिस्तरीय समिती गठीत करण्याचा शासन निर्णय.

८ ऑगस्ट २०१९ — 'महाज्योती'ची स्थापना

'महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था' (महाज्योती) स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय.

२०१९–२० — अंमलबजावणीसाठी संघर्ष

निधी, नोंदणी व कार्यालयासाठी सातत्याने आंदोलन; मुख्यालय नागपूरला; दिल्लीत ५०० विद्यार्थ्यांच्या यूपीएससी प्रशिक्षणाची सुरुवात; संचालक मंडळात विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून उमेश कोर्राम यांच्या नावाची मागणी.

आज महाज्योती —

ओबीसी, व्हीजे-एनटी प्रवर्गातील १ लाखाहून अधिक युवक-युवतींना शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य व प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था.

संघर्षाची क्षणचित्रे
Memorandum submission
निवेदन सादर करताना (२०१९–२०)
Dharna at Samvidhan Chowk
संविधान चौक, नागपूर येथे धरणे आंदोलन
Agitation
ओबीसी जनगणनेसाठी लाक्षणिक उपोषण
Mahajyoti office
महाज्योती कार्यालय, नागपूर
Press coverage
प्रसारमाध्यमांतील दखल
संपूर्ण संघर्ष — कागदपत्रे व बातम्या (PDF)